देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव भिवंडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव भिवंडीत
देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव भिवंडीत

देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव भिवंडीत

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. ९ (बातमीदार ) : भारतातील पहिले आदिवासी कार्बन न्यूट्रल गाव भिवंडी तालुक्यात उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय ग्रामविकास व पंचायतीराज मंत्री गिरिराज सिंह यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रकल्पाला निधी देण्याचे जाहीर केले आहे. पहिले आदिवासी गाव कार्बन न्यूट्रल करण्यासाठी केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
जम्मूमधील पल्ली गाव हे देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव झाले आहे. या गावात सौरऊर्जेचा वापर केला जात असून ग्रामपंचायतील सर्व रेकॉर्ड डिजिटल आहेत. या गावात ५०० किलोवॉटचा सोलर प्लांट बसवला आहे. त्याच धर्तीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन आदिवासी गावे व तेरा ग्रामपंचायती कार्बन न्यूट्रल करण्याचा निर्धार केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला आहे. त्यानुसार यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. बचत गटाच्या कार्यशाळा व सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्ताने ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अजूरदिवे येथे बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही उपस्थिती होती.
...
... या गावांचा आराखडा तयार
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दुधनी व अखिवली (वाफे) या आदिवासी गावांबरोबरच, भिवंडी तालुक्यातील सोनाळे, रांजणोली, अंजूर, दिवे अंजूर, काल्हेर, कशेळी, कोपर, पूर्णा, दापोडे, राहनाळ, वळ, माणकोली, ओवळी आदी गावे कार्बन न्यूट्रल गावे करण्याचा आराखडा तयार केला आहे.