Sat, April 1, 2023

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन तरुणांना अटक
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन तरुणांना अटक
Published on : 9 March 2023, 1:56 am
मनोर, ता. ९ (बातमीदार) ः मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गालगतच्या गावात अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तात्काळ दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास अल्पवयीन मुलीची ओढणी ओढून तिच्या अंगावरील कुर्ता फाडून विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपी पळून गेले. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.