पालिकेतर्फे आज महिलांना मोफत प्रवास

पालिकेतर्फे आज महिलांना मोफत प्रवास

विरार, ता. ९ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शुक्रवारी (ता. १०) जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पालिका आयुक्त अनिलकुमार पवार आणि परिवहन समिती सभापती भरत गुप्ता यांनी शुक्रवारी (ता. १०) एक दिवस महिलांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध केली आहे. वसई-विरार महापालिका महिला व बालकल्याण समितीमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवत आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने समितीने शुक्रवारी महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या निमित्तानेच पालिकेच्या परिवहन समितीतर्फे महिलांसाठी शुक्रवारी संपूर्ण दिवस परिवहनच्या ३२ मार्गांवर महिलांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com