बारावी पेपरफुटीप्रकरणी 
दोन महिलांसह पाच जणांना अटक

बारावी पेपरफुटीप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक

मुंबई, ता. ९ : परीक्षा केंद्रावर बारावीच्या प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी १० हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी अहमदनगर येथून एका मुख्याध्यापकासह पाच जणांना अटक करण्यात आली. किरण दिघे, अर्चना भामरे, भाऊसाहेब अमृते, वैभव तरटे, सचिन महारनवर अशी आरोपींची नावे आहेत. दादर येथील अँटोनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या तपासात दादरमधील विद्यार्थ्यांला मिळालेली प्रश्नपत्रिका ही नगरमधील आरोपींकडून मिळाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकासह दोन शिक्षक, एक चालक आणि शाळा मालकाच्या मुलीला अटक केली. यापूर्वी या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी (ता. ५) अहमदनगर येथून एका संशयिताला ताब्यात घेतले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com