घाटकोपरमध्ये नवविवाहित जोडप्याचे घरात मृतदेह

घाटकोपरमध्ये नवविवाहित जोडप्याचे घरात मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : घाटकोपर येथील नवविवाहित जोडपे बुधवारी (ता. ८) त्यांच्या राहत्या घरी मृत अवस्थेत सापडले. दीपक शहा (४०) आणि टीना शहा (३५) अशी दाम्पत्याची नावे आहेत. ते दोघेही घाटकोपरच्या कुकरेजा टॉवर्समध्ये राहत होते. शहा दाम्पत्य त्यांच्या नातेवाईकांच्या मोबाईल फोनला उत्तर देत नव्हते. दारावरची बेल वाजवली असता घरातून प्रतिसाद येत नव्हता, तेव्हा शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी बनावट चावीद्वारे घरात प्रवेश केला असता त्यांना हे जोडपे मृत अवस्थेत आढळले. पंतनगर पोलिसांनी प्रथमदर्शनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांना घरात संशयास्पद काहीही सापडले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com