Thur, June 8, 2023

शनिवारी कोपरीतील वाहतुकीत बदल
शनिवारी कोपरीतील वाहतुकीत बदल
Published on : 9 March 2023, 5:54 am
ठाणे, ता. ९ ( वार्ताहर) ः कोपरी भास्कर कट परिसरातील चिखलवाडी शौचालयासमोरील भूमिगत जलवाहिनीची दुरुस्ती ११ मार्चला पहाटे ६ वाजता करण्यात येणार आहे. याकरिता वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. कोपरीतून तीन हात नाक्याकडे जाण्याच्या मार्गावर भास्कर कट येथे मार्ग बंद करण्यात येणार आहे. तीन हात नाक्याकडून भास्कर कटकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना रघुवेल हॉटेल येथे प्रवेश बंद असेल.