मुंबईत तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह

मुंबईत तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार जयंती सोहळा मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांताक्रूझ, कुर्ला येथे यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात लहानांपासून मोठ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

सांताक्रूझ पूर्वेतील शिवप्रभू उत्सव समितीच्या वतीने शिवशक्ती सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सलग १० व्या वर्षी विभागीय शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी सांस्कृतिक महिला पथकाने शिवप्रतिमेची मिरणवूक काढली. पारंपरिक वाद्याच्या साथीने ही मिरवणूक काढण्यात आली होती. विशेष म्हणजे बाल कलाकारही या मिरवणुकीत राज्यांचा वेशभूषेत सहभागी झाले होते. जिजामाता, बालशिवराय अशी वेशभूषा या लहान कलाकारांनी साकारली होती.

कुर्ल्यात २०१९ पासून ‘एकच शिवजयंती सर्वत्र’ या घोषणेंतर्गत १२५ गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी केली. एकाच दिवशी म्हणजेच तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती सोहळा साजरा करण्याचे या मंडळांनी ठरवले होते. त्यानुसार यंदाच्या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा झाला. भव्य कबड्डी स्पर्धा, शिवदौड, शस्त्र प्रदर्शनी, मावळा खेळ तसेच शिवाजी महाराजांवरील व्याख्याने असे विविध कार्यक्रम करण्यात आले. या वेळी भव्य मिरवणूकही काढण्यात आली. त्यात साधारण ८ ते १० हजार शिवप्रेमी सहभागी झाले होते. या मिरवणुकीत लहान-थोर, ज्येष्ठ मंडळी तरुण-तरुणींनी उत्साहाने सहभाग घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com