
नवविवाहित तरुणाचा अपघाती मृत्यू
पालघर, ता. १० (बातमीदार) : पालघर-बोईसर मार्गावरील उंबरोळी येथे भरधाव चारचाकीचे टायर फुटल्याने चाकचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एका २३ वर्षीय नवविवाहित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कैफ इस्रार खान असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. यामध्ये अपघातात चारचाकीचा चक्काचूर झाला असून यामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे. चारचाकीतील जखमींना पालघरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत तरुणाचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले आहे. चुलत भावाच्या लग्नाचा हळदीचा कार्यक्रम करून हा तरुण नातेवाईकांना सोडण्यासाठी पालघर येथे आला होता, तो पुन्हा बोईसर येथे परत असताना भरधाव चारचाकीचे टायर फुटल्याने चारचाकी एका मोठ्या झाडावर आदळली. या अपघातामध्ये कारमधील तरुणासह चालक ही गंभीर जखमी झाला दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे कैफला डॉक्टरांनी मृत घोषित केले.