हत्या आणि मोक्यातील फरारी आरोपीस अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्या आणि मोक्यातील फरारी आरोपीस अटक
हत्या आणि मोक्यातील फरारी आरोपीस अटक

हत्या आणि मोक्यातील फरारी आरोपीस अटक

sakal_logo
By

ठाणे, ता. १० (वार्ताहर) : तब्बल अडीच वर्षे पोलिसांना गुंगारा देऊन आपले अस्तित्व लपवून वास्तव्य करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाने बोरिवली भागातून सापळा रचून आरोपी रॉबीन राजेश सिन्हा याला अटक केली. रॉबीन हा हत्या आणि मोक्का गुन्ह्यातील फरारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रॉबीन याच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात येथे हत्येचा गुन्हा, तर काळा चौकी येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. २०२० मध्ये खुनाच्या गुन्ह्यात महात्मा फुले चौक पोलिसांना रॉबीन हवा होता. मात्र आरोपी रॉबीन हा स्वतःचे अस्तित्व लपवून भारतभर वेगवेगळ्या शहरांत राहत होता. आरोपीची निश्चित माहिती पोलिसांना मिळत नव्हती. आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनेनुसार मालमत्ता गुन्हे शाखेने नमूद आरोपीचा अत्यंत चिकाटीने, कसोशीने तपास करून त्याची माहिती प्राप्त करून बोरिवली भागात सापळा रचून रॉबीनला अटक करण्यात आली.