मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १२) मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर; तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा-मुलुंड जलद मार्ग.
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत.
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढील असलेल्या या जलद गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणे येथून अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे
कुठे : सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४०वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी /वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणारी आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. या कालावधीत कुर्ला-पनवेल अप, डाऊन मार्गावर विशेष गाड्या धावण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.