जिद्दच ठाण्यामध्ये शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाईल : खासदार संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिद्दच ठाण्यामध्ये शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाईल : खासदार संजय राऊत
जिद्दच ठाण्यामध्ये शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाईल : खासदार संजय राऊत

जिद्दच ठाण्यामध्ये शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाईल : खासदार संजय राऊत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना अद्दल घडवू आणि त्यांचा सूडही घेऊ. ठाण्यातील जनता ही शिवसेनेसोबत आहे. त्यांची जिद्दच ठाण्यामध्ये शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाईल, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी ठाण्यात बोलताना व्यक्त केला; तर शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना हे नाते कधीही, कोणीही तोडू शकणार नाही. ठाणे हे बाळासाहेबांपाठोपाठ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामागे उभे राहिले आहे. तसेच मी स्वतः जाऊन उद्धव ठाकरे यांना सांगणार की, तुम्ही खेड व इतर ठिकाणी जशा सभा घेतल्या तशीच एक विराट सभा ठाण्यात घेऊन ठाणेकर जनतेशी संवाद साधावा, असेही ते म्हणाले.
ठाण्यातील मनोरमानगर, शनिमंदिर येथील शिवसेना शाखेच्या वतीने शुक्रवारी शिवजयंतीचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी खासदार राऊत यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे खासदार राजन विचारे उपस्थित होते. यावेळी बोलताना, येथे आल्यावर वाटले शिवजयंती सुरू आहे. ही शिवजयंती शिवसेनेची आहे. शिवरायांच्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आहे, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.