Wed, May 31, 2023

टीव्ही मालिकेच्या सेटला आग
टीव्ही मालिकेच्या सेटला आग
Published on : 10 March 2023, 3:12 am
मुंबई, ता. १० : मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीमध्ये (फिल्मसिटी) एका मालिकेच्या सेटवर भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. सेटवर मालिकेचे चित्रीकरण सुरू असतानाच ही आग लागली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही; परंतु आगीत मालिकेचा संपूर्ण सेट जळून खाक झाला. स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या २००० चौरस फूट पसरलेल्या सेटवर ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी सेटवर अडकलेल्या अनेकांना सुखरूप बाहेर काढून आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अस्पष्ट असून, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.