आगरवाडीत विद्यार्थी बनले शास्त्रज्ञ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगरवाडीत विद्यार्थी बनले शास्त्रज्ञ
आगरवाडीत विद्यार्थी बनले शास्त्रज्ञ

आगरवाडीत विद्यार्थी बनले शास्त्रज्ञ

sakal_logo
By

मनोर, ता. ११ (बातमीदार) : सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळाच्या आगरवाडी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रदर्शनात सहभाग घेत प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडले. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली. प्रदर्शनात विज्ञान विषयाची भित्तीपत्रके, ऐतिहासिक किल्ले, पृथ्वी संवर्धन, प्रदूषणाचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, राहत्या घरांचे विविध प्रकार, ग्रामीण विद्या वर्धिनी मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेची प्रतिकृती, चित्रकला, शिल्पकला आणि हस्तकचे नमुने सादर करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनात शाळेचे कार्यवाह पी. टी. पाटील, मुख्याध्यापिका रूपाली भोईर आणि सहशिक्षक उपस्थित होते.