Thur, June 1, 2023

चिंचलेत सामाजिक विषयांवर मार्गदर्शन
चिंचलेत सामाजिक विषयांवर मार्गदर्शन
Published on : 11 March 2023, 10:10 am
कासा, ता. ११ (बातमीदार) : जनसंवाद अभियानांतर्गत डहाणू तालुक्यातील चिंचले येथे महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कासा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत शिंदे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला सबलीकरण, बालमाता, बालविवाह, स्त्री शिक्षण, व्यसन मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी तारपा नृत्य करीत पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी पंचायत समिती सदस्य स्वाती राऊत, सरपंच, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.