वसई धर्मप्रांताच्या वतीने महिलांना शुभेच्छा

वसई धर्मप्रांताच्या वतीने महिलांना शुभेच्छा

विरार, ता. ११ (बातमीदार) : वसई धर्मप्रांताच्या महिला आयोगातर्फे होली क्रॉस चर्च, निर्मळ येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. सुमारे ९०० महिलांनी यात सहभाग दर्शवला. वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो हे कार्यक्रमाचे अध्यक्ष; तर मिरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री शिंदे आणि माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्त्रीही माझ्यासाठी केवळ स्त्री नसून ती माझी आई आणि बहीण आहे. ती अबला नसून सबला आहे. स्त्री नेहमी स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडून समाजाच्या रक्षणासाठी व सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी प्रयत्नशील असते. अशा सर्व महिलांचा नेहमी सन्मान व्हावा. आज मी जाहीरपणे तुमचे आभार मानण्यासाठी, तुमचा आदर करण्यासाठी आणि तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येथे उपस्थित आहे, असे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी सांगितले. ईशस्तवनाने व प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. होली क्रॉस स्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतनृत्य सादर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com