कळवा नवीन पुलावरील पाचवी मार्गिकाही वाहतुकीसाठी खुली

कळवा नवीन पुलावरील पाचवी मार्गिकाही वाहतुकीसाठी खुली

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : महापालिका कार्यक्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व कोंडीमुक्त करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. कळवा खाडीवरील जुन्या पुलावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन नवीन पुलाची उभारणी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. या नव्या पुलावरील तीन मार्गिका नोव्हेंबर २०२२ मध्ये वाहतुकीकरिता खुल्या करण्यात आल्या; तर चौथी मार्गिका डिसेंबरमध्ये खुली करण्यात आली. साकेतकडील पाचवी मार्गिका ही वाहतुकीकरिता मार्च २०२३ अखेरपर्यंत खुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, त्यापूर्वीच महापालिकेमार्फत सदर मार्गिका १० मार्च रोजी वाहतुकीसाठी खुली झाली करण्यात आल्यामुळे साकेतकडून कळवा-खारीगांव आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सोईचे झाले असून यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
कळवा पुलाप्रमाणेच शहरातील सुरू असलेले इतर प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे काम हाती घेतले असून वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी महापालिका व इतर शासकीय यंत्रणा यांच्यामार्फत प्रयत्न सुरू असल्याचेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले. साकेतकडून कळवा- खारीगांव व नवीमुंबईकडे जाणाऱ्या पाचव्या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असून त्यामुळे ठाणे शहरात अंतर्गत होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. कळवा पुलाच्या एकूण पाच मार्गिका असून यामध्ये ठाणे शहराकडून कळवा, खारीगांव, मुंब्रा तसेच नवीमुंबईकडे जाण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालय आणि ठाणे कारागृहामागील या दोन मार्गिका यापूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या केल्या आहेत. त्यामुळे कळवा चौक, ठाणे कारागृहासमोर होणारी वाहतूक कोंडी पूर्णपणे कमी झालेली आहे. तसेच या पुलाची तिसरी मार्गिका कळवा चौकात उतरत असून चौथी मार्गिका ठाणे- बेलापूर रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासमोर उतरवण्यात आलेली आहे.


पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी उपलब्ध
कळवा पुलावरील पाचवी मार्गिका साकेत रस्त्याकडून कळवा, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उपयुक्त असून सदर मार्गिका वर्तुळाकार पध्दतीने तयार करण्यात आलेली आहे. नवीन कळवा पुलाची एकूण लांबी २.४० किलोमीटर असून पुलावरील मार्गिकांची सरासरी रुंदी ८.५० मीटर इतकी आहे. या नवीन पुलाच्या सर्व मार्गिका वाहतुकीस उपलब्ध झाल्यामुळे आता पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी उपलब्ध झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com