महिला बालविकास प्रकल्पाच्या वतीने मेळावा

महिला बालविकास प्रकल्पाच्या वतीने मेळावा

मनोर, ता. ११ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिनिमित्त मनोरच्या महिला बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेलगतच्या समाज मंदिरात महिला मेळावा आयोजित करण्यात आला. आहार प्रात्यक्षिक आणि रांगोळी स्पर्धेनंतर मेळाव्याला उपस्थित महिलांनी तारपा नृत्यावर फेर धरला होता. मेळाव्याला जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा गुरोडा, पंचायत समिती सदस्य रंजना म्हसकर, बाळकृष्ण मढवी, मनोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निदा पटेल, कोसबाडच्या सरपंच प्रतीक्षा घाटाळ, टेनच्या उपसरपंच रेहाना पटेल, मनोरच्या बालविकास प्रकल्पाधिकरी रुपाली धुमाळ, पर्यवेक्षिका आर. आर. खताळ, यू. आर. सुरकर, सी. आर. राऊत, एम. एम. मोहिते यांच्यासह पालक, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. दहिसर तर्फे मनोर ग्रामपंचायतीच्या सभागृहात जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी सरपंच अंकिता भोईर, उपसरपंच उल्हास ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य साजिद शेख, अश्विनी भोईर, रुपेश नोक्ती उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com