शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी रवींद्र ठाकूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी रवींद्र ठाकूर
शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी रवींद्र ठाकूर

शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी रवींद्र ठाकूर

sakal_logo
By

पालघर, ता. ११ (बातमीदार) : पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी संघटना पॅनेलचे रवींद्र ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतपेढी संचालक मंडळाची निवडणूक २२ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. या निवडणुकीत संघटना पॅनेलचे १५ पैकी १२ उमेदवार विजयी झाले होते; तर विकास पॅनेलच्या तीन उमेदवारांनी विजय प्राप्त केला होता. युवाशक्तीच्या १४ उमेदवारांचे डिपॉझिट या निवडणुकीत जप्त झाले होते. पदाधिकारी निवडीची निवडणूक गुरुवारी (ता. ९) दुपारी पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी रवींद्र ठाकूर, उपाध्यक्षपदी सुहास दामोदर पारधी, कार्यवाहपदी रखमा रघुनाथ ढोणे व कोषाध्यक्षपदी सचिन चंद्रकांत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्थेचे वर्ग एकचे सुहास एन. पवार यांनी काम पाहिले. या वेळी संघटना राज्य समन्वयक पी. टी. पाटील, पतपेढीचे माजी अध्यक्ष संतोष पावडे, चिंतामण ठाकूर, संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष वागेश कदम, पी. एम. पाटील, संघटना व समन्वयक समिती अध्यक्ष मायकल घोन्सालविस, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश प्रधान उपस्थित होते.