भंगार चोरीचा डाव फसला

भंगार चोरीचा डाव फसला

मनोर, ता. ११ (बातमीदार) : तारापूर औद्योगिक वसाहतीलगतच्या बंद अवस्थेतील रामशाम टेक्स्टाईल कंपनीमधील लोखंडी शेडची भंगार माफियांकडून गॅस कटरच्या सहाय्याने कटिंग सुरू असताना ग्रामस्थांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे भंगार चोरीचा डाव उधळला. रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या चोरीची माहिती स्थानिक ग्रामस्थांना समजताच भंगार चोरांनी काम अर्धवट सोडून घटनास्थळावरून पळ काढला. ग्रामस्थांनी चोरीची माहिती बोईसर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. घटनास्थळी कटिंग केलेल्या लोखंडाचे तुकडे जागेवर आढळून आले.
तारापूर औद्योगिक वसाहतीलगतच्या कोलवडे ग्रामपंचायत हद्दीतील रामश्याम टेक्स्टाईल कंपनी गेल्या काही वर्षांपासून बंद असल्यामुळे कंपनीच्या आवारात गवत आणि झाडे-झुडपे वाढली आहेत. कंपनी मुख्य रस्त्यापासून शंभर फूट आत असल्याने भंगार माफियांनी डाव टाकला होता. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखाने भंगार माफियांकडून लक्ष्य करण्यात आले आहेत. बंद कारखान्यांतील लोखंड आणि तांब्याच्या वस्तूंच्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शेकडो टन वजनाची लोखंडी शेड विकून पैसे कमावण्याचा भंगार माफियांचा डाव जागरूक ग्रामस्थांनी हाणून पाडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com