Sat, June 3, 2023

वसई विकासिनी संस्थेचे वार्षिक चित्रप्रदर्शन
वसई विकासिनी संस्थेचे वार्षिक चित्रप्रदर्शन
Published on : 11 March 2023, 10:13 am
वसई, ता. ११ (बातमीदार) : वसई विकासिनी संस्थेच्या रॉबी डिसिल्व्हा कॉलेजचे ३७ वे वार्षिक चित्रकला प्रदर्शन १० ते १३ मार्च या कालावधीत वसई विकासिनी भवन येथे आयोजित केले आहे. या वेळी विविध चित्रांची रंगसंगती पाहावयास मिळणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, संचालनालय संचालक राजीव मिश्रा यांच्या हस्ते पार पडले. या वेळी संस्थेतर्फे वसई विकासिनी कॉलेजचे माजी विद्यार्थी सचिन चौधरी व प्रताप मोरे यांचा राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. प्रदर्शन विनामूल्य असून वसई तालुक्यातील शाळांनी व पालकांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे सरचिटणीस विजय वर्तक व प्राचार्य धनराज खाडे यांनी केले आहे.