आश्रमशाळेतील मुलींची राज्यस्तरीय खोखोत गरुडभरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आश्रमशाळेतील मुलींची राज्यस्तरीय खोखोत गरुडभरारी
आश्रमशाळेतील मुलींची राज्यस्तरीय खोखोत गरुडभरारी

आश्रमशाळेतील मुलींची राज्यस्तरीय खोखोत गरुडभरारी

sakal_logo
By

बोर्डी, ता. ११ (बातमीदार) : नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात झाई येथील आश्रमशाळेच्या मुलींनी उपविजेतेपद पटकावले. या निमित्त शासकीय प्राथमिक आश्रमशाळेत विजेत्या मुलींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी घोलवड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मयुरेश शेवाळे, ग्रुप ग्रामपंचायत झाईचे उपसरपंच प्रकाश पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण बेंडगा, शाळेचे मुख्याध्यापक के. व्ही. मंदावाड, अधीक्षक, अधीक्षिका, सर्व शिक्षक उपस्थित होते. मुलांना शाळेकडून भेटवस्तू म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र, तसेच मनोज खुलात यांच्याकडून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना कंपासपेटी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुलांना यशापर्यंत पोहचवण्यात मोलाचा वाटा असलेले क्रीडाशिक्षक संजय चोरमले यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.