डहाणूत लाकूड चोरीसत्र सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत लाकूड चोरीसत्र सुरूच
डहाणूत लाकूड चोरीसत्र सुरूच

डहाणूत लाकूड चोरीसत्र सुरूच

sakal_logo
By

कासा, ता. ११ (बातमीदार) : डहाणू पूर्व भागात अजूनही मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल असून अनेक साग, खैर व इतर वनसंपत्ती मुबलक प्रमाणात आहे. त्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गाशेजारी घनदाट जंगल असल्याने अजूनही या भागात खैर, साग चोरीचे सत्र सुरूच आहे. वनसंपत्ती चोरीची अनेक प्रकरणे घडत असून कासा वन परिक्षेत्र विभागात गेल्या वर्षभरापासून रात्रीची ग्रस्त भरारी पथके सुरू केली असून या पथकाने अनेक चोरीचा माल जप्त केला आहे.
गेल्या महिन्याभरापूर्वी रानशेत, वधना वन परिक्षेत्रात खैर तस्कर यांनी चोरीचा प्रयत्न केला. यात वनविभागाने तपास करून तेथील माल जप्त करून भराड येथील डेपोमध्ये जमा केला, अशी माहिती वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुजय कोळी दिली. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. वाघाडी उनयी बंधारा येथे खैर तस्करी करणारा टेम्पो व माल असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. फेब्रुवारीमध्ये पिंपळशेत येथे खैर तस्करी करणारा टेम्पो व माल असा दोन लाख ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डहाणू-जव्हार रस्त्यांवर व मुंबई-अहमदाबाद मार्गावर रात्रीच्या वेळी रस्त्यालगत असणाऱ्या वन संपत्तीची चोरी करण्याचा प्रयत्न केला जातो. यात तस्कर वाहन व टेम्पो सोडून पळून जाण्यात यशस्वी होत आहेत. यामुळे वनविभागाने अजून उपाययोजना राबवणे गरजेचे आहे, असे वनप्रेमींचे म्हणणे आहे.
----------------

वनविभाग परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती असून या भागाच्या रक्षणासाठी, लाकूडतोड रोखण्यासाठी रात्रीचे ग्रस्त पथक तयार केले आहे. यामुळे रात्रीची तस्करी रोखली जात आहे. त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांनादेखील २४ तास अलर्ट राहण्यास सांगितले आहे.
- सुजय कोळी, वनक्षेत्रपाल, कासा वनविभाग