संत जोसेफ सोसायटीच्या अध्यक्षपदी लिनस डिकूना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत जोसेफ सोसायटीच्या अध्यक्षपदी लिनस डिकूना
संत जोसेफ सोसायटीच्या अध्यक्षपदी लिनस डिकूना

संत जोसेफ सोसायटीच्या अध्यक्षपदी लिनस डिकूना

sakal_logo
By

विरार, ता. ११ (बातमीदार) : संत जोसेफ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत लीनस डिकूना यांच्या नेतृत्वाखाली जागृत पॅनेलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले होते. निवडणुकीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी लीनस डिकूना; तर उपाध्यक्षपदी जेम्स घोन्सालवीस यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डिकूना यांनी सांगितले की, सभासदांनी ज्या विश्वासाने आम्हा संचालकांना निवडून दिलेले आहे त्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. संस्थेची प्रगती नेटाने करण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करू. संस्थेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याने संस्था पूर्वपदावर आणण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचित संचालकांसमोर असणार आहे.