Wed, June 7, 2023

महिलांसाठी मोफत डोशाची मेजवानी
महिलांसाठी मोफत डोशाची मेजवानी
Published on : 11 March 2023, 10:12 am
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कल्याणमध्ये मिलिंद चव्हाण यांनी खास गर्भवती महिलांना मोफत डोसा खाऊ घातला. सुमारे ४०० महिलांनी डोशाची चव चाखली. मिलिंद चव्हाण हे एका हॉस्पिटलमध्ये कामाला असून तेथे येणाऱ्या गर्भवती महिलांना होणाऱ्या त्रासाची त्यांना जाण आहे. महिलांना या दिवसांत जास्त भूक लागत असून त्यांना झटपट असे काही तरी बनवून खायला घालायची मिलिंद यांची इच्छा होती. महिला दिनाचे औचित्य साधत त्यांनी खास गर्भवती महिलांसाठी मोफत डोशाचे वाटप केले.