कल्याण परिमंडलात महिलांचा सन्मान

कल्याण परिमंडलात महिलांचा सन्मान

कल्याण, ता. ११ (बातमीदार) : महावितरणच्या कल्याण परिमंडलात महिला दिन साजरा करण्यात आला. कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे व कल्याण परिमंडलचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते सर्व महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नगररचना विभागाच्या सहायक संचालक दिशा सावंत‍ आणि सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सुजाता अंगडी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या वेळी कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उपमहाव्यवस्थापक सायली झवेरी, मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, कार्यकारी अभियंते, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता अनिता चौधरी यांनी; तर सहायक लेखापाल रेवती धादवड यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com