Thur, March 30, 2023

रविवारी वांद्रे बँडस्टँडवर
रविवारी वांद्रे बँडस्टँडवर
Published on : 11 March 2023, 10:11 am
आज वांद्रे बॅण्डस्टॅण्डवर
स्पोर्टस् कारचा थरार
मुंबई, ता. ११ ः फॉर्म्युला वन कार रेसिंग चॅम्पियन डेव्हिड कौल्थर्ड याच्यासह रेसिंग स्पोर्टस् कार आरबी-७ चा थरार वांद्र्याच्या बॅडस्टॅण्डवर रविवारी (ता. १२) मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. ‘रेड बुल इंडिया’तर्फे आयोजित शो रन सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहील. रेसिंग चॅम्पियन डेव्हिड कौल्थर्ड याने १३ वेळा फॉर्म्युला वन ग्रां. प्रि. स्पर्धा जिंकली आहे. डेव्हिडने २००९ मध्येही वांद्र्याच्या सी-लिंकवर स्पोर्टस् कारचा पहिला शो रन केला होता. दरम्यान, फ्रीस्टाईल स्टंट बायकर आरास गिबिझा याचेही धाडसी कारनामे पाहायला मिळणार आहेत.
मुंबईतील स्पर्टस् कारचा थरार (संग्रहित छायाचित्र).