Wed, March 22, 2023

गस्ती नौकेला अनोळखी नौकेची धडक
गस्ती नौकेला अनोळखी नौकेची धडक
Published on : 11 March 2023, 12:05 pm
रेवदंडा, ता. ११ (बातमीदार) : रेवदंडा परिसरातील समुद्रात हार्मोनी पोलिस नौका गस्त घालत असताना एका डबल केबिनच्या नौकेने जोरात धडक दिली. या दुर्घटनेत गस्ती नौकेचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तुषार वाळुंज (वय २८) यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.