कांदिवलीमध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या

कांदिवलीमध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : डोंगरावरून उडी मारून एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना मुंबईतील समतानगर परिसरात घडली. दोघांच्या नात्याला दोन्ही कुटुंबांकडून विरोध असल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे यातील तरुणी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी (ता. १०) पहाटे मुलगी घरात नसल्याचे बघून तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. तिने तिचा मोबाईल घरीच ठेवला होता. तिच्या कुटुंबीयांनी तिचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. तिचे संबंध आकाशसोबत असल्याचे माहीत असल्याने त्याच्या घरी चौकशी करण्यात आली. तेव्हा तोही बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्याच्या मोबाईलचे लोकेशन पाठाचे पाणी या आदिवासी पाड्याजवळील खदान परिसरात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह आढळून आले. मुलाचा मोबाईल तपासला असता त्यावरून ‘आम्ही जात आहोत, परत येणार नाही. काळजी घ्या’ असा संदेश त्याने त्याच्या आईला पाठवल्याचे दिसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com