मद्यधुंद अवस्थेत कचराळी तलावात 
अडकलेल्या तरुणाची सुटका

मद्यधुंद अवस्थेत कचराळी तलावात अडकलेल्या तरुणाची सुटका

ठाणे, ता. ११ (वार्ताहर) : मद्यप्राशन करून ठाणे पालिकेच्या मुख्यालयासमोरील कचराळी तलावात सफारीसाठी फायरबोट घेऊन निघालेला तरुण अडकला होता. याबाबत माहिती मिळताच ठाणे पालिकेचे सुरक्षा रक्षक जगदीश राठोड यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी नौपाडा पोलिस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी तरुणाला सुखरूप बाहेर काढून नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. अक्षय आत्माराम दुबे (वय २८, रा. टेकडी बंगला, ठाणे) हा तरुण शनिवारी (ता. ११) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कचराळी तलाव परिसरात आला होता. त्या ठिकाणी असलेली पालिकेची फायरबोट घेऊन तो पाण्यात गेला आणि मद्यप्राशन करीत होता. मद्यधुंद अवस्थेत असल्याने तो तलावात अडकला होता. याबाबत माहिती पालिका सुरक्षा रक्षक जगदीश राठोड यांनी दिल्यावर नौपाडा पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक आले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी पोहत जाऊन अक्षयला तलावामधून सुखरूप बाहेर काढले आणि नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com