रेल्वे स्थानकावरील अपघातात तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे स्थानकावरील अपघातात तरुणाचा मृत्यू
रेल्वे स्थानकावरील अपघातात तरुणाचा मृत्यू

रेल्वे स्थानकावरील अपघातात तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात तरुणाचा अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटनेची चित्रफीत समोर आली आहे. हा अपघात सोमवारी (ता. ६) झाल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल थोरवत (वय ३५) असे या तरुणाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. राम मंदिर रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

राहुल सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घरी परतत असताना हा अपघात घडला. फलाट क्रमांक ३ वरून धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा हात सुटून तोल गेला. त्यामुळे तो लोकल आणि फलाटाच्या पोकळीत पडला. काही अंतर तो फरपटत गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. राहुल कोल्हापूरमधील चंदगडचा असून बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर तो नोकरीसाठी मुंबईत आला होता. गेल्या दहा वर्षांपासून तो मुंबईत सिक्युरिटीमध्ये नोकरी करत होता. दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. सध्या पत्नीसह तो मुंबईतील नालासोपारा येथे राहत होता.