Tue, June 6, 2023

भायखळ्यातून ६० लाखांचे ‘एमडी’ जप्त
भायखळ्यातून ६० लाखांचे ‘एमडी’ जप्त
Published on : 11 March 2023, 3:23 am
मुंबई, ता. ११ : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ६० लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम मेफेड्रोन एमडीसह दोघांना भायखळा येथून अटक केली. मदनपुरा भागात सापळा रचून अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबईतील अनेक पोलिस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे. यापैकी एकावर २०१७ पासून अमली पदार्थ तस्करीचे ३ गुन्हे दाखल आहेत. आरोपीला २०२१ मध्ये दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटकेतील दोघेही आंतरराज्य ड्रग सिंडिकेटचे सदस्य असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाने दिली आहे.