भिवंडीत रसायनांसह ट्रक जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत रसायनांसह ट्रक जळून खाक
भिवंडीत रसायनांसह ट्रक जळून खाक

भिवंडीत रसायनांसह ट्रक जळून खाक

sakal_logo
By

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : अंजूरफाटा ते माणकोली मार्गावर आज (ता. ११) पहाटेच्या वेळी रसायनाचे ड्रम भरलेल्या ट्रकला आग लागल्याने तो जळून खाक झाला. पाच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. नारपोली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत पुढील कारवाई सुरू केल्याचे सांगण्यात आले.

अंजूरफाट्यावरून माणकोलीच्या दिशेने आज पहाटेच्या वेळी जाणाऱ्या रसायनांच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. या घटनेची माहिती ट्रकचालकास मिळताच त्याने ट्रक रस्त्यावर उभा करून पळाला. ही घटना समजताच नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलास पाचारण केले. मात्र घटनास्थळी प्लास्टिकच्या ड्रमचा स्फोट होऊन ते हवेत उडत होते; तर काही आजूबाजूला पडत होते. अशा भयानक स्थितीने अग्निशमन दल सावधानतेने आग विझवण्याचे काम करीत होते. या मार्गावरून जाणारी वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती.