
१६ नव्या कोरोना रुग्णांची जिल्ह्यात नोंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हळूहळू वाढताना दिसत आहे. शनिवारी कोरोनाच्या नव्या १६ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेषतः ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात त्यापैकी ११ रुग्ण आहेत. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सक्रिय रुग्णांचा आकडा हा ५८ वर पोहोचला आहे.
ठाणे पालिकेमध्ये नोंदवलेल्या ११ रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या २७ इतकी झाली आहे; तर नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी २ रुग्ण सापडले आहेत. सक्रिय रुग्णांची नवी मुंबईमधील संख्या १०, तर ठाणे ग्रामीणची संख्या ८ झाली आहे. मिरा भाईंदरमध्ये एक रुग्ण नोंदवला गेला असून, तोच एक सक्रिय रुग्ण आहे. कल्याण-डोंबिवलीत शनिवारी रुग्ण आढळून आला नसला तरी तेथील सक्रिय रुग्णांची संख्या ही ४ आहे. उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव, बदलापूर या ठिकाणी शनिवारी एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही. उल्हासनगरमध्ये २, भिवंडीत ६ सक्रिय रुग्ण आहेत. कुळगाव-बदलापूरला सक्रिय रुग्ण नसल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली.