पाड्या-पाड्यांमध्ये विज्ञान मेळाव्याचा उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाड्या-पाड्यांमध्ये विज्ञान मेळाव्याचा उत्साह
पाड्या-पाड्यांमध्ये विज्ञान मेळाव्याचा उत्साह

पाड्या-पाड्यांमध्ये विज्ञान मेळाव्याचा उत्साह

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : विक्रमगड येथूनच जवळच असलेल्या टेटवाली पाड्यामध्ये प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व जिल्हा परिषदे शाळा यांच्या सहकार्याने विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्याप्रमाणे जीवन हे पृथ्वी, पाणी, हवा, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांपासून बनलेले आहे असे मानले जाते, ही तत्त्वे सोप्या पद्धतीने मुलांना समजण्यासाठी प्रथम फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने हे मेळावे आयोजित करण्यात आले. विज्ञान प्रकल्प मुलांसोबत तयार करण्यात आले. याकरिता मुलांना गावातील स्वयंसेवक, माता पालक, शिक्षकांनी मुलांना सहकार्य केले.
मुलांना विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, शास्त्रज्ञांविषयी अधिकची माहिती व पंचतत्त्व काय आहे हे मुलांसोबतच पालकांना व गावकऱ्यांनासुद्धा समजण्यासाठी या विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या पंचतत्त्वांसोबतच मुलांनी पाठ्यपुस्तकातून आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या मदतीने इतर प्रकल्पसुद्धा बनवले होते. त्याचेसुद्धा मेळाव्यात सादरीकरण करण्यात आले होते. या मेळाव्यात गावातील स्वयंसेवक आणि युवकांनी सहभाग घेतला होता.