तापमान वाढीने पशुधनावर संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तापमान वाढीने पशुधनावर संकट
तापमान वाढीने पशुधनावर संकट

तापमान वाढीने पशुधनावर संकट

sakal_logo
By

अलिबाग, ता. १२ (बातमीदार)ः जिल्ह्यात उष्णतेची लाट दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशातच पावसाळ्यानंतर आता उन्हाळ्यात होणाऱ्या विषाणूजन्य रोगांमुळे जिल्ह्यातील पशुधनावर नवे संकट ओढवले आहे. त्यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कामाला लागला असून गावागावात लसीकरणाला वेग आला आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्याचे तापमान वाढले आहे. कधी ढगाळ वातावरण; तर कधी उन्हाचे चटके अशा बदलत्या वातावरणामुळे पशुधनाचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मिळेल तेथे पाणी पिऊन पाळीव जनावरे आपली तहान भागवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यामुळे पाळीव जनावरांना ताप, अपचन होणे, प्रकृती खालावणे अशा लाळखुरकत विषाणूंच्या संसर्गाचा धोका बळावला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील गाय व म्हैस अशा वर्गातील दोन लाख ३९ हजार १३१ इतक्या पशुधनांसाठी दोन लाख १५ हजार २०० लसीच्या मात्रा पशू विभागाने उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे तालुका स्तरावर लसीकरणाचे कामयुद्ध पातळीवर केले जात असून या मोहिमेला पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-----------------------------------------
लाळखुरकतचा धोका
गाय, म्हैस या दुधाळ जनावरांच्या व सहा महिन्यांपुढील वासरांच्या संवर्धनाबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीने लाळखुरकत लसीकरण पशुसंवर्धन विभागामार्फत गेल्या आठ दिवसांपासून लसीकरण सुरू केले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास तोंडातून लाळ गळणे, दुधाचे प्रमाण कमी होणे तसेच जनावरे मरण पावण्याचा धोका निर्माण होतो. पावसाळ्यात लाळखुकरत विषाणूचा सर्वाधिक धोका असतो, पण उन्हाळ्यातही जनावरांना या विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक असतो.
-------------------------------------------------------------------
लाळखुरकत हा विषाणूजन्य आजार गाय व म्हैस वर्गातील जनावरांना होण्याची शक्यता अधिक असते. पशुधनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरणाचे काम वेगात करण्यात आले. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
- डॉ. राजेश लाळगे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय अलिबाग
-------
लसमात्रा वाटपावर दृष्टिक्षेप
तालुके - लस - जनावरांची संख्या
अलिबाग - १२,००० - १३,४१९
पनवेल - ११, ८०० - १३,२३६
पेण - १३, ६०० - १५,२८१
कर्जत - ३३, ८०० - ३७,६९१
उरण - ४००० - ४,५६४
रोहा - १७, ३०० - १९,३९९
पाली - १५,१०० - २६,९००
खालापूर - १२, ५०० - १३,९०७
माणगाव - २०, ००० - २२,२५८
महाड - २९, ००० - ३२,२४८
मुरूड - ६, ९०० - ७,६५०
म्हसळा - १०, ००० - ११,१४५
तळा - ९,२०० - १०,३७४
श्रीवर्धन - ७,००० - ७,६३०
पोलादपूर - १३,००० - १३,४२९
--------------------------------
एकूण - २,१५, २०० - २,३९,१३१