गोफण खाडीत एकाचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोफण खाडीत एकाचा मृतदेह
गोफण खाडीत एकाचा मृतदेह

गोफण खाडीत एकाचा मृतदेह

sakal_logo
By

रोहा, ता. १२ (बातमीदार)ः वावे पोटगे येथील जंगलात एका २५ वर्षीय विवाहित गरोदर महिलेची हत्या केल्याची घटना ताजी असताना तालुक्यातील गोफण खाडीत आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. आठ दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने दोन्ही घटनांमधील व्यक्तींची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
गोफण येथील कुंडलिका खाडीत एक पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला आहे. या परिसरात मच्छीमारीसाठी गेलेल्या मारुती म्हात्रे यांना हा मृतदेह दिसून आला होता. या व्यक्तीचे वय साधारण ४० ते ५० वर्षे असून त्याने अंगात काळ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. त्यामुळे अशा वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास त्यांनी रोहा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रोह्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी केले आहे.