महावितरणच्या ठेकेदराची महिलेला मारहाणम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या ठेकेदराची महिलेला मारहाणम
महावितरणच्या ठेकेदराची महिलेला मारहाणम

महावितरणच्या ठेकेदराची महिलेला मारहाणम

sakal_logo
By

अलिबाग, ता. १२ (बातमीदार)ः तालुक्यातील बेलपाडा येथील एका विवाहित महिलेला मारहाण करून दुखापत केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. या महिलेवर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून महावितरणच्या ठेकेदराने ही मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.
बेलपाडा येथील सारिका पाटील शनिवारी सकाळी घरात एकट्याच असताना साडेअकराच्या सुमारास महावितरण कंपनीने नेमलेल्या ठेकेदाराने त्यांच्या जागेत विद्युत खांब लावण्यासाठी खड्डा खोदण्यास सुरुवात केली. या कामाला सारिका पाटील यांनी विरोध केला होता. तसेच घरात कोणीही पुरुष मंडळी नाही, त्यांना येऊ द्या, त्यानंतर काम चालू करा असे सांगितले होते; मात्र या गोष्टीचा राग आल्याने प्रदीप पाटील नामक व्यक्तीने रागाच्या भरात महिलेला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.