नुकसानीचे वस्तूनिष्ठ अहवाल सादर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुकसानीचे वस्तूनिष्ठ अहवाल सादर करा
नुकसानीचे वस्तूनिष्ठ अहवाल सादर करा

नुकसानीचे वस्तूनिष्ठ अहवाल सादर करा

sakal_logo
By

मोखाडा, ता. १२ (बातमीदार) : राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फळबाग, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मोखाडा तालुक्यातही सलग तीन दिवस झालेल्या वादळी पावसामुळे फळबाग लागवडीखालील क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची पालघर जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. यंत्रणांना सविस्तर पंचनामे करून वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडक यांनी दिले आहेत.
पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके यांनी मोखाड्यातील नुकसानग्रस्त फळबागाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. कोणताही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित रहाणार नाही, असा शेतकऱ्यांना विश्वास दिला आहे. या वेळी मोखाडा तहसीलदार मयूर खेंगले, तालुका कृषी अधिकारी सुनील पारधी, मंडळ कृषी अधिकारी आकाश सोळुंके, प्रेमदास राठोड, कृषी पर्यवेक्षक विकास बोरसे, प्रशांत कुंडले कृषी, भरत पवार, कृषी सहायक विजय जाधव, दीपक कोल्हे, महेश शितोळे, जयवंत बाळशी, बापू लांबाडे, खोडाळा मंडळ महसूल निरीक्षक हरेश जनाठे, तलाठी विकास ठाकरे, अविनाश वड, देविदास चौरे, शरद बिन्नर उपस्थित होते.

-------------------
कोणीही वंचित राहू नये
मोखाडा तालुक्यात काजू ३१५.५० हेक्टर, आंबा २६५.९० हेक्टर क्षेत्र हे फळबाग लागवडीखाली आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसलेला आहे. पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके यांनी शुक्रवारी (ता. १०) सकाळी ७ वाजल्यापासून मोखाडा तालुक्यात नुकसानग्रस्त क्षेत्रास प्रत्यक्ष भेटी देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली आहे. यात खोडाळा, डोलारा, कोशिमशेत (सडकवाडी), सातुर्ली या गावातील नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन संबंधित शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्याशी चर्चा केली. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.

फोटो...
खोडाळ्यातील फळबागांचे नुकसान झालेल्या तुकाराम भोये यांच्या फळबागेची पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके, तहसीलदार मयूर खेंगले आणि कृषी अधिकारी.