अ‍ॅड. जॉय डिसोजा यांची निवड

अ‍ॅड. जॉय डिसोजा यांची निवड

विरार, ता. १२ (बातमीदार) : जागृती सेवा संस्थेचे चिंतन शिबिर सहयोग सेंटर भुईगाव येथे पार पडले. ४३ सभासद या चिंतन शिबिरासाठी उपस्थित होते. या शिबिरात ‘तरुणांची सामाजिक कार्यातील गरज’ या विषयावर कवी सायमन मार्टिन यांनी मार्गदर्शन केले. ‘माझ्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात जागृतीचे महत्त्व’ या विषयावर अनेक सभासदांनी आपली मते व्यक्त केली. या चिंतन शिबिरात २०२२ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी जागृती सेवा संस्थेच्या नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी अ‍ॅड. जॉय डिसोजा यांची; तर उपाध्यक्षपदी सुहास रिबेलो यांची निवड करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com