Mon, May 29, 2023

सायन रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती
सायन रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती
Published on : 12 March 2023, 10:32 am
मुंबादेवी, ता. १२ (बातमीदार) : मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक (सायन) रुग्णालयात शनिवारी (ता. ११) छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुष्पांजली अर्पण केली. शिवरायांचे चरित्र आजच्या आणि भावी पिढीला कायम प्रेरणा देत राहील, असे उद्गार मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काढले. सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहन जोशी, दिलीप दळवी, सुनील परब, प्रभाकर सकपाळ, स्मिता कोरगावकर यांच्या पुढाकाराने हा उत्सव पार पडला. या उत्सवात रुग्णालयातील कर्मचारीही सहभागी झाले होते.