Sun, May 28, 2023

सायबर गुन्हे रोखण्यासाठी वडाळा लोहमार्ग पोलिसांची जनजागृती
सायबर गुन्हे रोखण्यासाठी वडाळा लोहमार्ग पोलिसांची जनजागृती
Published on : 12 March 2023, 10:36 am
वडाळा, ता. १२ (बातमीदार) ः वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी वडाळा रेल्वे पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील शहर हद्दीत सीताराम प्रकाश हायस्कूल येथे वडाळा लोहमार्ग पोलिसांच्या वतीने वरिष्ठ निरीक्षक डी. एम. खुपेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता. ११) जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात मुलींना सायबर गुन्हे कसे घडतात याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना व मार्गदर्शनपर सूचना देण्यात आल्या. या वेळी वडाळा लोहमार्ग पोलिस, गोपनीय शाखेचे अंमलदार, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.