Sun, May 28, 2023

मानसिक, शारीरिक समस्यांबाबत महिलांना मार्गदर्शन
मानसिक, शारीरिक समस्यांबाबत महिलांना मार्गदर्शन
Published on : 12 March 2023, 10:38 am
गोरेगाव, ता. १२ (बातमीदार) : राजमित्रा हॅालिडेजतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त बोरिवलीतील हॅाटेल बे व्हिव्ह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ महिलांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर महिला गायिकांनी मनोरंजन कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास लाईफ कोच सोनल सातेलकर, डॅा. धनवंती हातळकर, मैथिली सावंत, कनीनिका निनावे, ॲड. मंजुळा विश्वास या मान्यवर उपस्थित होत्या; तसेच सुप्रसिद्ध लेखिका, पटकथाकार, अभिनेत्री, कवयित्री रोहिणी निनावे या प्रमुख अतिथी म्हणून हजर होत्या.