शिवळेत शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवळेत शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
शिवळेत शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

शिवळेत शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

sakal_logo
By

सरळगाव, ता. १२ (बातमीदार) : शिवजयंतीच्या निमित्ताने शिवळे येथे भव्य मिरवणूक पार पडली. या वेळी शेकडो शिवभक्तांचा सहभाग होता. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती शिवळे गावात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावात वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ही मिरवणूक संपूर्ण गावात फिरून गावातील शिवळेश्वर मंदिरात विसर्जित करण्यात आली. या वेळी बालकलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अनेक कार्यक्रम सादर केले. कर्जत तालुक्यातील भजनसम्राट मिथुनबुवा कोंढवले यांनी सुश्राव्य शिवगीते व पोवाडे सादर केले. राकेश पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सादर केली; तर त्यांच्या समवेत इतर तरुणांनी मावळ्यांची भूमिका सादर केली.