
उल्हासनगरात नेत्रहीन दिव्यांग महिलांना साडीवाटप
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजसेवकांच्या पुढाकाराने उल्हासनगरातील नेत्रहीन दिव्यांग महिलांना साडीवाटप करून आणि चविष्ट जेवणाची मेजवानी देऊन महिला दिवस साजरा करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाजवळ असलेल्या ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन हितकारी संघाच्या कार्यालयासमोर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ढालू नाथानी, इंदर गोपलानी, जय झुलेलाल संघर्ष समिती, सोहम फाऊंडेशन टीम, वी द पिपल एनजीओ टीमचे कुमार पंजवानी, भावना छाबरिया, वंदना शर्मा, सेंच्युरी रेयॉन महिला मंडलप्रमुख मोनीष भाटिया, प्रकाश तलरेजा, विश्वशिवाय फाऊंडेशनच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त नेत्रहीन दिव्यांग महिलांना साडीसोबत भोजनवाटप करण्यात आले. या वेळी ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनचे जगदीश पटेल, सुशीला पटेल उपस्थित होते.