शतपत्रांद्वारे स्त्रीयांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शतपत्रांद्वारे स्त्रीयांना मार्गदर्शन
शतपत्रांद्वारे स्त्रीयांना मार्गदर्शन

शतपत्रांद्वारे स्त्रीयांना मार्गदर्शन

sakal_logo
By

गोरेगाव, ता. १३ (बातमीदार) : केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे महिला दिनानिमित्त ‘स्त्रियांची शतपत्रे’ हा कार्यक्रम पार पडला. साधारणतः २०० वर्षांपूर्वी मासिके व वृत्तपत्रात छापून आलेली ही पत्रे लेखिका स्वाती कर्वे यांनी अभ्यासपूर्ण निवडून काढली होती. त्यांनी स्त्रियांची शतपत्रे असा ग्रंथ लिहिला आहे, ज्याच्यावर आधारित हा कार्यक्रम होता. ही पत्रे सुमित्रा देवधर, दीपाली शहाणे, नेहा किणी, जान्हवी दरेकर व सागर रानडे यांनी अभिवाचनातून सादर केली. या कार्यक्रमाची संकल्पना, संपादन आणि दिग्दर्शन विलास पागार यांचे होते. तसेच निर्मिती सहाय्य देवेंद्र प्रभुदेसाई व निर्मितीप्रमुख सुनील देवधर होते. या कार्यक्रमात स्त्रियांच्‍या राजकीय, सामाजिक व संवेदनशील विचारांची मांडणी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्राच्या वाचनापासून करण्यात आली. तसेच ज्ञानप्रकाश, केसरी, ज्ञानोदय, स्त्री मासिक, आर्यभगिनी आणि रविवार सकाळसारख्या वृत्तपत्र व मासिकांत प्रकाशित झालेली निवडक पत्रे वाचण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वाधार संस्थेच्या माजी उपाध्यक्षा वसुधा नेने यांच्या स्मरणार्थ वसुधा नेने साहाय्य फंड चालवले जात आहेत. ज्यात गरजू महिलेला मदत केली जाते. या वेळी आस्मा शेख नामक एका युवतीला पुढील शिक्षणाकरिता निधी देण्यात आला.