Sun, June 4, 2023

शौर्या अंबुरेचे यूथ गेम्स ॲथलेटिक्समध्ये यश
शौर्या अंबुरेचे यूथ गेम्स ॲथलेटिक्समध्ये यश
Published on : 12 March 2023, 11:04 am
ठाणे, ता. १२ : ठाण्यातील ब्रह्मांड येथील युनिव्हर्सल शाळेत ८ वीत शिकणाऱ्या शौर्या अंबुरे हिने चिपळूण येथील डेरवण येथे पार पडलेल्या ६०, १०० व १५० मीटर धावण्याच्या शर्यतीत १४ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक प्राप्त करून हॅट्ट्रिक केली आहे. १०० मीटरची धावण्याची स्पर्धा तिने १२.७ सेकंदात पूर्ण केल्याने शौर्या या स्पर्धेत वेगवान धावपटू ठरली आहे. चिपळूण येथील डेरवण येथे ७ ते १० मार्चदरम्यान यूथ गेम्स ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली. श्री विठ्ठल राव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने एसव्हीजेसीटीच्या क्रीडा संकुलात पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, नेमबाजी, फुटबॅाल अशा विविध खेळांचे सामने रंगले होते.