मॉरिशसमधील चिमुकल्यावर नवी मुंबईत शस्त्रक्रिया

मॉरिशसमधील चिमुकल्यावर नवी मुंबईत शस्त्रक्रिया

नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : अकाली जन्मलेल्या आणि जन्मजात हृदयरोग आणि मूत्रपिंड निकामी झालेल्या मॉरिशस येथील १० दिवसांच्या बाळावर नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. मॉरिशस येथून भारतात चिंताजनक परिस्थितीत आणण्यात आलेल्या या बाळावर महाधमनीचा अरुंद भाग रुंद करण्यासाठी को-आर्क्टोफ्लास्टी करून ॲब्जॉर्बेबल (शोषणयोग्य) स्टेंट बसवण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली गेली. त्यामुळे या बाळाला तीन दिवसांनी यांत्रिक व्हेंटिलेटरच्या मदतीशिवाय श्वास घेता आला.

मॉरिशसमधील रुग्णालयात या बाळाचा नॉर्मल डिलिव्हरीद्वारे अकाली जन्म झाला होता. जन्म झाल्यानंतर हे बाळ दिव्यांग, सायनोज्ड (निळसर) झाले होते. त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यामुळे बाळाला निओनॅटल आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर बाळाला जन्मजात गंभीर हृदयरोग, मूत्रपिंड पूर्णपणे निकामी आणि बायलॅटरियल लो-सेट इयर्स यासह डिस्मोर्फिक फीचर्स, हायपरट्रोफाइड (अतिवृद्धी) झालेले हात आणि पाय व बायलॅटरियल क्लबफूट या समस्या असल्याचे आढळून आले. या बाळाचे हृदय स्थिर झाल्यानंतर त्याला प्रगत उपचारांसाठी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे पाठवण्यात आले होते. येथे त्याच्यावर आपत्कालीन को-आर्क्टोफ्लास्टी केली गेली. या प्रक्रियेनंतर बाळाच्या अवस्थेत लक्षणीयरित्या सुधारणा झाल्याचे अपोलो हॉस्पिटल्सचे बालरोग कार्डिओलॉजी सल्लागार डॉ. भूषण चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com