मॉर्फ व्हिडीओ प्रकरणात दोन आरोपी अटकेत

मॉर्फ व्हिडीओ प्रकरणात दोन आरोपी अटकेत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १२ : शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची समाज माध्यमांवर मॉर्फ केलेली चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली. अशोक मिश्रा आणि मानस कुवर अशी त्यांची नावे आहेत. शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी विनयभंग व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

श्रीकृष्णनगर परिसरात शनिवारी (ता. ११) रात्री विकासकामांच्या उद्‍घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्रीकृष्णनगर येथून अशोकवन जंक्शन, दहिसर पूर्वपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आणि अशोकवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून करण्यात आले. या रॅलीतील चित्रफीत मॉर्फ करून व्हायरल करण्यात आल्याने शीतल म्हात्रे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच चित्रफितीबाबत शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत या प्रकरणी माहिती उघड केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com