मुंबईत ‘वंदे भारत लोकल’ धावणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत ‘वंदे भारत लोकल’ धावणार?
मुंबईत ‘वंदे भारत लोकल’ धावणार?

मुंबईत ‘वंदे भारत लोकल’ धावणार?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे ‘वंदे भारत’च्या धर्तीवर आता ‘वंदे भारत लोकल’ सुरू करण्याचे नियोजन करत आहे. सध्या यावर प्राथमिक स्वरूपात रेल्वे बोर्डाचा अभ्यास सुरू आहे. लवकर यावर मोठी घोषणा होणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
‘मेड इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली ‘वंदे भारत’ ट्रेन हिट ठरली आहे. आता त्यापाठोपाठ रेल्वे बोर्डाकडून वंदे भारत मेट्रो ट्रेनची बांधणी सुरू करण्यात आली आहे. या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत वंदे मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी शहरांतर्गत प्रवासासाठी वंदे मेट्रो संकल्पना जाहीर केली होती. याशिवाय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी नुकतेच सांगितले, की रेल्वे बोर्ड शहरात वंदे भारत प्रकारच्या लोकल गाड्या चालवण्याच्या शक्यतेचा विचार करत आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेद्वारे दररोज तीन हजारांपेक्षा जास्त उपनगरीय लोकल सेवा चालवण्यात येत आहेत. यामधून ७० लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत. याशिवाय गेल्या काही वर्षांपासून वातानुकूलित लोकल गाड्या सुरू झाल्या आहेत. त्यांनासुद्धा प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे लक्षात घेऊन भविष्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर येणाऱ्या वातानुकूलित लोकल या ‘वंदे भारत लोकल’ असणार असल्याची माहिती मिळत आहे.
...
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून माहिती
भारतातील सर्वांत आधुनिक आणि नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज, नवीन पिढीच्या हायस्पीड वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस ही ईएमयूमध्ये मोडते. लोकल आणि एसी लोकल गाड्यांचे वर्गीकरण त्याच तंत्रज्ञानाखाली केले गेले आहे. त्यामुळे लोकलमधून पडून होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास जलदगतीने करण्यासाठी वंदे भारत लोकलची संकल्पना समोर आली आहे. या सर्व गाड्या महाराष्ट्रातील लातूरचा कारशेडमध्ये तयार होणार आहेत. संध्या वंदे भारत लोकलच्या संकल्पनेवर काम सुरू असल्याची माहिती रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.