धारावीत रोहित्रला आग

धारावीत रोहित्रला आग

धारावी, ता. १२ (बातमीदार) : धारावी मुख्य रस्त्यावरील बडी मस्जिद येथील नगरी कंपाऊंड येथील ‘बेस्ट’च्या रोहित्राला (ट्रान्स्फॉर्मर) शनिवारी रात्री बाराच्या दरम्यान अचानक आग लागली. स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत मातीचा मारा करून आग आटोक्यात आणली. त्‍यानंतर कारखान्यातील आग नियंत्रण यंत्राद्वारे आग क्षमवल्याने मोठी दुर्घटना टळली.
नगरी येथील इमारतीखाली असलेल्या रोहित्राला आग लागल्याचे इमारतीतील रहिवाशांनी आरडाओरडा सुरू केला. त्‍यावर स्थानिक तरुण सईफ व अन्य तीन ते चार तरुणांनी रोहित्राचे शटर तोडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मातीचा मारा सुरू केला. या रोहित्राच्या गेटला असलेल्या टाळ्याची चावी ‘बेस्ट’कडे असते. त्यामुळे तरुणांनी टाळे तोडून आग आटोक्यात आणली जर आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले नसते, तर मोठी दुर्घटना घडून जीवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाले असते.
आग लागल्याची माहिती स्थानिकांनी बेस्ट, अग्निशमन दलाला लगेच दिली होती. मात्र, अग्निशमन दलाचे जवान जवळपास दीड तासांनी आल्याचे स्थानिक समाजसेवक जाफर करानिया यांनी सांगितले; तर दोन तासांनी ‘बेस्ट’चे कर्मचारी पोहोचले; त्यांनी विद्युतपुरवठा बंद केल्याने कल्याणवाडी, हयात कंपाऊंड, डब्बावाली चाळ, डोंगरखाना, अबूबकर चाळ, नई बस्ती आदी विभागातील वीज गुल झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com